अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील फॅक्टरीत कार्यरत असलेल्या एका बाल कामगाराचा बग्यास विभागातील मशीनच्या बेल्ट मध्ये अडकून मृत्यू झाल्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या कामगार व ऊस तोड मुकादम युनियनच्या जिल्हाध्यक्ष दादासाहेब पाडळे यांनी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले आणि कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी त्यांनी श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना निवेदन देऊन प्रकरणाची चौकशी केली.
याचबरोबर कारखान्याचे एम.डी. व श्रीगोंद्याच्या नायब तहसीलदार यांनाही पीडित कुटुंबाच्या मदतीसह पुनर्वसनाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. १७ नोव्हेंबर २०२० रोजी श्रीगोंदा फॅक्टरी येथील रहिवासी समीर शेख, वय १५ वर्षे या बालमजुराचा कारखान्यात बग्यास विभागात काम करत असताना, मशीनच्या बेल्टमध्ये अडकून दुर्दैवी अपघात झाला.
यानंतर पुण्यात उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाल्याबाबत सामाजिक माध्यम व वृत्तपत्रांतील बातम्यातून समजले. त्या अनुषंगाने पिडीत, वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी कार्यरत असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उसतोड कामगार, मुकादम संघटना पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणा संदर्भात नमूद पीडिताच्या पुनर्वसन व मदतिसाठी संघटनेने पुढाकार घेतला असल्याचे सांगितले आहे.
श्रीगोंदा तालुक्यामध्ये साधारण चार कारखाने कार्यरत असून, यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यातून किंवा दुर्गम भागातून मागासवर्गीय सह आर्थिकदृष्ट्या मागास असलेले समाजबांधव उपजीविकेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांना येणाऱ्या मुलभूत अडचणी व मुलांच्या शैक्षणिक प्रश्नांसह विविध घटना-दुर्घटनामध्ये संघटनेच्या माध्यमातून श्रीगोंदा फॅक्टरी येथील मयत समीर शेखच्या निमित्ताने घडलेल्या बाल कामगाराच्या मृत्यू प्रकरणाची सर्वोतपरी चौकशी करून,
अल्पवयीन किंवा बालकामगार धोकादायक किंवा हानिकारक ठिकाणी कार्यरत ठेवणे कायदेशीर गुन्हा असताना, संबंधित कारखाना प्रशासनाने या मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, कुटुंबाचे पुनर्वसन करावे, घरातील एका सदस्यास कायमस्वरूपी संबंधित कारखान्यात नोकरी द्यावी,
यापुढे बाल मजुर किंवा बाल कामगारांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करावा, राज्यातील दुर्गम भागातून आलेल्या ऊसतोड कामगारांसाठी मुलभूत सुविधांची निर्मिती करावी, अशा मागण्याचे निवेदन वंचित बहुजन आघाडी च्या ऊस तोड कामगार मुकादम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दादासाहेब पाडळे यांच्यासह संघटनेतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा अध्यक्ष दादासाहेब पाडले व पदाधिकाऱ्यांनी पीडित शेख कुटुंबातील सदस्यांची भेट घेऊन सांत्वन केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved