अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- पदवीधर शिक्षकांचे प्रश्न सुटण्यासंदर्भात पदवीधर शिक्षक महासंघाच्या वतीने आमदार रोहित पवार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाने कर्जत येथे पवार यांची भेट घेतली.
दम्यान पदवीधर शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन पवार यांनी शिष्टमंडळास दिले. नेमक्या काय आहेत प्रलंबित मागण्या?
जाणून घ्या सविस्तर पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकपदी प्रशिक्षित पदवीधर शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, शिक्षकांचे वैद्यकीय देयकांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा,
केंद्रप्रमुख यांच्या रिक्त जागा भरण्यात याव्या, विषय शिक्षकांना सरसकट वेतन श्रेणी देण्यात यावी, सातव्या वेतन आयोगात पदवीधर शिक्षकांवर झालेला
वेतन श्रेणी बाबतचा अन्याय दूर व्हावा, एमएससीआयटी संगणक प्रशिक्षणाला मुदतवाढ मिळावी, भविष्य निर्वाह निधीसाठी बीडीएस प्रणाली सुरू करण्यात यावी,
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांचा समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन आमदार पवार यांना देण्यात आले.
पदवीधर शिक्षकांचे अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबीत आहेत. या प्रश्नामुळे शिक्षकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र आमदार पवार यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने शिक्षकांमध्ये दिलासादायक संदेश गेला आहे.