देशी दारूचा साठा जप्त… या तालुक्यात पोलिसांची कारवाई

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट झाला आहे. यास रोख बसावा यासाठी पोलिसांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.

पारनेर तालुक्यातील पळशी येथील पोपट उर्फ पप्पू भाउसाहेब गायकवाड (वय २२ रा. भिल्ल वस्ती, पळशी) हा त्याच्या घराच्या आडोशाला विना परवाना बेकायदा देशी दारू विक्री करताना आढळून आला.

त्याला पारनेर पोलिसांच्या पथकाने रंगेहात पकडला. पारनेर पोलिस ठाण्याच्याच्या पथकातील सुरज दिलीप कदम व त्यांचे सहकारी पळशी येथे गेले असताना

पोपट उर्फ पप्पू गायकवाड हा बेकायदेशीर दारूची विक्री करीत असल्याची माहीती त्यांना मिळाली. त्यांनी गायकवाड याच्या घरावर छापा टाकला असता

तेथे तो देशी दारूची विक्री करीत असल्याचे आढळून आले. पथकाने त्याच्या कब्जातील ४६ जीएम संत्रा दारूच्या सिलबंद बाटल्या हस्तगत करून त्यास अटक केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24