अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- डेडिकेटेड सर्व्हिस सेंटर व डॉ. आंबेडकर वसतिगृहातील कोवीड केअर सेंटरमधील गलथान कारभारामुळे रुग्णांची हेळसांड होत अाहे.
सेवा, सुविधेत त्वरित सुधारणा व्हावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा भारतीय जनता पक्षाने प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, किरण लुणिया, नगरसेवक दीपक चव्हाण, अभिजित कुलकर्णी, मनोज हिवराळे, संजय यादव, गणेश भिसे, शेखर आहेर,
सोमनाथ कदम, राहुल अस्वले, मुकेश साळवे, विशाल त्रिवेदी, आनंद बुधेकर आदींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जर्मन हॉस्पिटलमधील रुग्णांना अपुऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांमुळे नीट उपचार मिळत नाहीत.
आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. तीन व्हेंटिलेटर असूनही कोविड हॉस्पिटलचा दर्जा नसल्याने प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध होत नाही. त्यामुळे व्हेंटीलेटर वापरता येत नाही.
डॉ. आंबेडकर वसतिगृहातील केअर सेंटरमधील तपासणी केंद्राच्या सुरू व बंद होण्याच्या वेळा निश्चित नाहीत. ऑक्सिजन कमी झालेल्या
रुग्णांना व्हेंटिलेटरसाठी नगरला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवले जाते. तेथे बेड शिल्लक नसल्यास रुग्ण स्वीकारायला नकार दिला जातो.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved