अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील चार ही साखर कारखान्यावरील सर्व अवैध धंदे दारू, मटका, जुगार, सोरट, हे बंद करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अनिल पाडळे यांनी केली आहे.
पाडळे यांनी याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाणे व बेलवंडी पोलीस ठाणे येथे निवेदन दिले असून तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
ऊस तोड कामगार हा पहाटे थंडीत शेतामध्ये चार वाजेच्या सुमारास ऊस तोडणी साठी कामाला जातात संध्याकाळी कष्ट करून येतात उसाचे वाडे विकून चार पैसे कमवून आल्यानंतर त्या ऊस तोडणी मजुराचे पैसे जुगार,
दारू, मटक्यात जातात. काही वेळेस त्यांचे मुलं बाळ कुटुंब उपाशी राहतात यासाठी येथील अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अनिल पाडळे
यांनी श्रीगोंदा पोलीस ठाणे व बेलवंडी पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे मागणी केली आहे हे अवैध धंदे बंद न झाल्यास वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आंदोलन उपोषण करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved