Ahmednagar News : मराठ्यांचे संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील यांनी व राज्यभरातील मराठा समाजाच्या मागणीनुसार मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्या, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या व सगेसोयरेचा कायदा करावा.
अशा मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने शनिवारी नगर शहर परिसरातील नगर मनमाड रोड, शेंडी बायपास, भिंगार,
केडगाव या चार ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले. सर्व ठिकाणी शांततेत आंदोलन झाले. मात्र या आंदोलनांमुळे महामागांवरील वाहतूक काहीवेळ ठप्प झाल्याने वाहनांच्या दुरवर रांगा लागल्या होत्या.
सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे, ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण दिले जावे, आतापर्यंतच्या आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, कुणबी नोंदी शोधणाऱ्या शिंदे समितीच्या कामाला मुदतवाढ द्यावी, हैदराबाद गॅझेट व नव्याने सापडलेले सातारा गॅझेट यामधून मराठा समाज हा कुणबी असल्याचे सिद्ध होत असल्याने हे दोन्ही गॅझेट स्वीकारावेत.
आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गावा-गावात रस्ता रोको आंदोलनाचे आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत नगर शहरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी नगर मनमाड महामार्गावरील राजमाता जिजाऊ चौकात (डेअरी चौक, शेंडी बायपास), भिंगारला वेशीजवळ, केडगाव वेशीजवळ व शेंडी येथे नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी पाऊण वाजेपर्यंत दीड तास रस्ता रोको आंदोलन केले.
शेंडी व एमआयडीसी आंदोलनाच्या ठिकाणी तहसीलदारांनी येऊन निवेदन स्वीकारले तर अन्य दोन ठिकाणी स्थानिक अधिकारी आले होते. यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी,
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेद्माम, सहायक पोलीस निरीक्षक राम कपॅ, पोखर्डीचे माजी सरपंच रामेश्वर निमसे, शेंडी ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश कराळे, आदेश भगत, मारूती कराळे, सचिन कराळे, तुषार नवाळे,
अमोल हुंबे, गोरक्षनाथ कराळे, पप्पु भगत, सार्थक भगत, अनिल कराळे, भरत कदम, भगवान चव्हाण, ओंकार चव्हाण,
निरंजन चव्हाण, बाळासाहेब निमसे, जगन्नाथ निमसे, विजय दाणी, आदीसह सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. आंदोलकांनी रस्तावर ठिय्या दिल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
तर भिंगार येथे सकल मराठा समाज भिंगारच्यावतीने विजय लाईन चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांना वाशीच्या सभेत मुख्यमंत्री यांनी दिलेल्या शब्द व पत्रात दिलेल्या आदेशानुसार सरकारने लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा,
तसेच मराठा आरक्षणात राहिलेल्या त्रुटी दुरुस्त कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. जोपर्यंत अध्यादेश पारीत होत नाही तोपर्यंत विविध स्वरुपाचे आंदोलन होणार आहे.
सरकारने आध्यादेश देऊन जी मराठा समाजाची फसवणुक करुन मुंबईमधून मराठ्यांना पाठीमागे पाठवल्याने, यामधून मराठा समाज पुन्हा एकदा रास्ता रोको करुन आपल्या भावना मराठा बांधवांकडून व्यक्त करण्यात आल्या आहे. या वेळी संपत बेरड, शामराव वाघस्कर, राजेश काळे,
कैलास वाघस्कर, दीपक लिपाने, गणेश बेरड, अरुण चव्हाण, अंकुश शिंदे, नवनाथ मोरे, पंकज चव्हाण, नवनाथ कापसे, गणेश सातकर, मच्छिद्र बेरड, रोहित बावारे, संजय सपकाळ, रमेश कडूस,
सुरेश बेरड, कल्याण पवने, विलास तोडमल, श्रीकांत क्षीरसागर, योगेश साळुंखे, ईश्वर बेरड, संग्राम जगताप, संजय कापसे, रोहित चव्हाण, सचिन क्षिरसागर, सोमनाथ मोरे, अविष्कार बोठे, सुरज मिसाळ, अक्षय तोडमल, आदी उपस्थित होते.