पावसात भिंतीच्या आडोशाला थांबणे ‘त्यांना’ पडले महागात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-  मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध भागात पाऊस कोसळत आहे. यात अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे.

कालच्या पावसात नेवासा तालुक्यातील वांजोळी परिसरातील एमआयडीसी येथे एका कंपनीची भिंत कोसळून त्याखाली दबल्याने ३ शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेत शेतकऱ्याचे जवळपास ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वांजोळी परिसरात रविवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली.

या पावसामुळे परिसरातील तलाव, ओढे, नाले तुडूंब भरुन वाहत होते. मेघगर्जनेसह जोरदार पडलेल्या पावसात येथील एमआयडीसीतील एका कंपनीच्या भिंतीच्या आडोशाला थांबलेल्या

शेळ्यांवर भिंत कोसळल्याने तीन शेळ्यांचा त्याखाली दबून मृत्यू झाला. याबाबत काशीनाथ दाणी यांनी प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधत झालेल्या घटनेबाबत माहिती दिली.