शेतीच्या वादातून दोन गटांत तुफान हाणामारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :-राहुरी तालुक्यातील गुहा येथे शेताच्या बांधावरुन दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये कुर्‍हाडीसह लाकडी दांडके, लोखंडी पाईपचा वापर झाला.

या घटनेप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरुन दोन्ही गटाच्या सोळा जणांविरुद्ध राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल असून आरोपी पसार झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, गुहा येथील जुना सात्रळ रस्त्यावरील ओहोळ-भालेराव कुटुंबियांत धूमश्चक्री झाली. भालेराव कुटुंबाने कुर्‍हाड व कुदळीच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप ओहोळ कुटुंबाने केला.

तर बांधाच्या वादातून ओहोळ कुटुंबाने लोखंडी पाईप, कुर्‍हाडीच्या दांड्याने मारहाण केल्याचा आरोप भालेराव कुटुंबाने केला आहे.

या प्रकरणी सिद्धार्थ राजेंद्र ओहोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बाळासाहेब दगडू भालेराव, सतीश दगडू भालेराव, दगडू लक्ष्मण भालेराव, सुरेश भागवत ओहोळ, राहुल सुरेश भालेराव, रवींद्र दगडू भालेराव,

अशोक सुरेश भालेराव (सर्व रा.गुहा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बाळासाहेब दगडू भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अशोक गणपत ओहोळ, नंदा अशोक ओहोळ, राजेंद्र गणपत ओहोळ,

सुनीता रमेश ओहोळ, सुनीता राजेंद्र ओहोळ, निखील राजेंद्र ओहोळ, अक्षय राजेंद्र ओहोळ, प्रवीण अशोक ओहोळ, विकास रमेश ओहोळ (सर्व रा.गुहा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24