अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पाथर्डी : तालुक्यातील वादळी पावसाने पाचशे बेचाळीस घरांची पडझड झाली आहे. साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरील फळबागाचे नुकसान झाले आहे. करंजी, मिरी, कोरडगाव, पाथर्डी, तिसगाव, माणिकदौंडी परिसरात पिकांचे जास्त नुकसान झाले आहे
. दोघांचा मृत्यू झाला आहे. पडलेली घरे व नुकसान झालेल्या पंचनामे करावेत व कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सरकारी नियमांची कडक अमंलबजावणी करावी, असे आदेश आमदार मोनिका राजळे यांनी दिले आहेत.
शनिवारी दुपारी तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनात बैठकीत राजळे बोलत होत्या. प्रांतअधिकारी देवदत्त केकाण, पोलिस उपअधिक्षक मंदार जवळे, ,तहसिलदार नामदेव पाटील, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी, तालुकाकृषी अधिकारी प्रवीण भोर,नायब तहसीलदार पंकज नेवसे उपस्थीत होते.
यावेळी बोलताना राजळे म्हणाल्या, अधिकाऱ्यांनी अवकाळी पाऊस व वादळाने फळपिकांचे व पडलेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. तलाठी, कृषीसहाय्यक, ग्रामसेवक हे फळपिकांचे शेतात जाऊन पंचनामे करावेत. तालुक्यात आडगाव (खंडु लोंढे) व सोनोशी (कलाबाई दौंड) येथील मयतांच्या वारसांना सरकारी मदत द्यावी.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com