अहमदनगर बातम्या

Ahmednagar Murder News : अनोळखी व्यक्तीचा भोसकून खून, शेतात मृतदेह सापडला

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Murder News : राहाता तालुक्यातील लोणी- तळेगाव रस्त्यावर गोगलगाव शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खून कोणाचा व कोणी कोणी केला, याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रविवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास लोणी पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळाली. गोगलगांव शिवारात लोणी ते तळेगाव रस्त्यावर गोरडे पेट्रोल पंपानजीक सोमनाथ भाऊसाहेब मगर यांच्या शेतीत गट क्र. ५०५/१ मध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला.

त्याचा कुठल्यातरी हत्याराने भोसकून खून करण्यात आला होता. घटनेनंतर लोणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे, उपनिरीक्षक योगेश शिंदे व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

ठसेतज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले. मयत पुरुषाच्या अंगावर चेक्सचा शर्ट, जीन्स पॅट, पायात विटकरी रंगाची चप्पल व वय अंदाजे ४५ ते ५५ दरम्यान असून कुणाला या व्यक्तीबद्दल माहिती असेल तर लोणी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करीत आहेत. याप्रकरणी लोणी पोलिसात गुन्हा रजिस्टर क्र. ४४५ / २३ भा. दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office