अहमदनगर बातम्या

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

गणेश विसर्जन मिरवणूक शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी ८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही व ड्रोन कॅमेऱ्याचीही नजर असणार आहे.

दहा दिवसांच्या धार्मिक बातावरणानंतर आज गुरुवारी (दि.२८) ‘लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावर प्रकर्षाने जाणवले असून ही विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे.

विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ तसेच ड्रोनद्वारे प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी टॉवर उभारण्यात आले असून टेहळणी पथकांची नजर मिरवणुकीतील ‘हालचालीबर असणार आहे. विसर्जन मार्गावरील उंच इमारतींची छते ताब्यात घेतली असून यावरून मिरवणुकीतील हालचाली टिपण्यात येणार आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24