होर्डिंगच्या विळख्यात अडकलेल्या नेहरूंसाठी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-पहिले पंतप्रधान पंडिक जवाहरलाल नेहरू यांच्या लालटाकी येथील पुतळ्याला पूर्णतः झाकून टाकणारे होर्डिंग्ज ‘तुम्ही हाटवता, की आम्ही हाटवू’ असा आक्रमक पवित्रा घेत विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मनपाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले आहे.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी काँग्रेसने याबाबत मनपा प्रशासनाला धारेवर धरले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याच्या भोवती असणाऱ्या कंपाउंड वर उभारण्यात आलेले जाहिरात फलक काढून घेण्यात यावे अशी मागणी यावेळी केली.

मनपा उपायुक्त संतोष लांडगे यांचे दालन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या ‘अमर रहे, अमर रहे, पंडित नेहरू अमर रहे’ अशा घोषणा त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेसचे सुजित जगताप, प्रवीण गीते, अमित भांड, प्रमोद अबुज, राज गायकवाड, प्रशांत जाधव, सचिन वारुळे, राज घोरपडे, सोमनाथ गुलदगड, योगेश जयस्वाल, सिद्धार्थ कारंडे, ऋतिक शिराळे, आदित्य तोडमल, जय शिंदे, आदी उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24