कोटा आणि माऊंट अबू येथून विद्यार्थी आणि प्रवासी अहमदनगर जिल्ह्यात दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- काल रात्री कोटा (राजस्थान) येथून ३२ विद्यार्थी नगरमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या बसने दाखल झाले. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली संबंधित तालुक्यात ठेवण्यात आले.

आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यासोबतच सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसेस ही नगरमध्ये जात होत्या. यावेळी जिल्हा पोलिस दल आणि घर घर लंगर परिवाराच्या वतीने या विद्यार्थ्यांना फूड पॅकेट, पाण्याची बाटली सोबत देण्यात आली. त्यामुळं हे विद्यार्थीही भारावले आणि त्यांनी एसटी महामंडळ, पोलिस विभाग आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.

माऊंट अबू येथे कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील १११ भाविक गेले होते. त्यांचेही काल जिल्ह्यात आगमन झाले. जिल्ह्याच्या चेकपोस्ट वर तसेच तालुका सीमेवर त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली संबंधित तालुक्यात ठेवण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24