अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगले संपादन केले आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा-2021 मध्ये नेवासा तालुक्यातील इयत्ता पाचवी मधील एकूण 21 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड झाली.
दरम्यान याबाबतची माहिती गटशिक्षणाधिकारी सौ.सुलोचना पटारे यांनी दिली. विशेष बाब म्हणजे एका विद्यार्थ्याची राज्य गुणवत्ता यादीत निवड झालेली आहे.
तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तालुक्यातील एकूण 31 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेली आहे. अशा एकूण 52 विद्यार्थ्यांची जिल्हा गुणवत्ता यादीत निवड झाली आहे.
दरम्यान सदर परीक्षेसाठी नेवासा तालुक्यातील एकूण पाचवीसाठी 2691 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. यापैकी 518 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेत.
तर इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 1474 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ झाले आहेत. त्यापैकी 39 विद्यार्थी पात्र झाले आहेत. असे एकूण 557 विद्यार्थी पात्र झालेले आहेत.