अहमदनगर बातम्या

आरोग्य विभागाच्या गोंधळमय परीक्षेकडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या या परीक्षेसाठी १७ हजार ६३३ उमेदवार होते. त्यापैकी ८ हजार १२२ उमेदवारांनी रविवारी परीक्षा दिली. तर ९ हजार ५११ उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली.

यामुळे जवळपास निम्मे उमेदवार परीक्षेला आलेच नाहीत. आरोग्य विभागाच्या सहा हजार पदांसाठी रविवारी परीक्षा झाली. यात जिल्ह्यात ४१ केंद्रावर झालेल्या परीक्षेत निम्म्या उमेदवारांनी दांडी मारली.

दोन सत्रात घेण्यात आलेल्या या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांची परीक्षा सकाळच्या सत्रात एका केंद्रावर झाली तर दुसऱ्या सत्रातील परीक्षा दुसऱ्याच केंद्रावर झाली.

त्यामुळे दुपारच्या सत्रातील परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उमेदवारांना उशिर झाला. त्यासाठी अनेकांना धावपळ करावी लागली.

पहिल्या व दुसऱ्या सत्रातील परीक्षा केंद्रावर मोठे अंतर असल्यानेच अनेकांनी परिक्षेला दांडी मारल्याचे समजते आहे. परीक्षा केंद्रात गोंधळ नसला तरी उमेदवारांना देण्यात येणाऱ्या केंद्रामुळे अनेकांना त्रास झाला.

जिल्ह्यातील बरेचसे विद्यार्थी परीक्षेला बाहेरच्या जिल्ह्यात होते, तर बाहेरच्या जिल्ह्यातील उमेदवार नगर व परिसरातील केंद्रावर परीक्षेला आले होते.

Ahmednagarlive24 Office