अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- नेवासा तालुक्यातील सुरेगाव-गंगा ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील वसंत शिंदे (वय 50 वर्षे) यांनी प्रवरा संगम येथील गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सुनील शिंदे यांनी कर्जबाजारीपणा व अतिपावसाने संपूर्ण खरीप पिकाचे नुकसानीला कंटाळून दि.11 ऑक्टोबर रोजी प्रवरासंगम पुलावरून गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केली असावी अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून मिळाली होती.
तसेच प्रवरा संगम येथील गोदावरी नदी पुलावर त्यांची मोटारसायकल व चपला सापडल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता निर्माण झाल्याने दि.11 पासून नदी पात्रात शोध सुरू होता.
दोन दिवस मृतदेह सापडला नसल्याने गूढ निर्माण झालेले होते. मात्र आज दि.13 रोजी सकाळी मृतदेह नदीत पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने सुनीलने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. सुरेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.