Ahmednagar News : अहमदनगर शहराचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने राहुरी शहरातील अहिल्याभवन येथे फटाके फोडून व पेढे वाटप करून नुकताच जल्लोष करण्यात आला.
अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर होवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावे, या मागणीसाठी राहुरी तालुक्यातील यशवंत सेनेचे जिल्हाप्रमुख विजयराव तमनर, दत्ताभाऊ खेडेकर, ज्ञानेश्वर बाचकर, सचिन डफळ, राजेंद्र तागड, अॅड. अक्षय भांड, विनोद पाचारणे,
बापुसाहेब बाचकर, निशांत दातीर, अशोकराव कोळेकर, किरण थोरात, सुनिल नजन, सचिन कोळपे, जगन्नाथ गावडे, शंकर खेमनर, किरण थोरात, इंद्रजित खेमनर, अमोल खेमनर, भागाजी गावडे, राजूमामा तागड आदींसह हिंदू समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीची स्थापना केली होती.
या समितीच्या वतीने मागील वर्षी संपूर्ण नगर जिल्ह्यात नामांतर यात्रा काढण्यात आली होती. सुमारे १५ दिवस चाललेल्या या यात्रेत राहुरी, नगर, पारनेर, जामखेड, श्रीगोंदा, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, संगमनेर, अकोले, असा सुमारे १००० किमीचा प्रवास करून प्रत्येक तालुक्यातील गावागावातील ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संघटना यांनी नामांतरासाठी केलेले सुमारे ११०० ठराव जमा करून सदरील ठराव हे शासनाच्या विविध विभागांना पाठविण्यात आले होते.
अखेर या कृती समितीला यश आले असून आज मंत्रीमंडाळच्या बैठकीत अहमदनगर शहराच्या नामांतरणाबाबत महत्वपूर्ण बैठक होऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदरील निर्णयाचे नामांतर कृती समितीच्या वतीने राहुरी येथील अहिल्याभवन येथे अहिल्यादेवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व नंतर फटाके फोडत,
पेढे वाटप करून राज्य सरकारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी अलकाताई दादाभाऊ तमनर, वडीतके भाऊसाहेब, प्रा. गडधे, दादाभाऊ तमनर, पोपट शेंडगे, वसंत पाटोळे, कैलास केसकर, महेश तमनर,
भारत मतकर, सुजित तमनर, अनिस शेख, दर्शन खेडेकर, श्रीकांत खेमनर, कोंडीराम बाचकर, सुरज विटनोर, गौतम गाडे, योगेश लबडे, तमनर पेंटर, भागवत झडे, अनिल डोलनर आदींसह मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे जन्मगाव असलेल्या जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नाव देवून अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा व भविष्यात युवकांना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीचे विजय तमनर यांनी व्यक्त केले.