अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-आय.आय.टी. च्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी जेईई अॅडव्हान्स परीक्षा मनाची मानली जाते. या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी खूप खडतर प्रयत्न करावे लागतात.
या परीक्षेत श्रीरामपूरच्या तन्मय मारुती वाघ या विद्यार्थ्याने संपूर्ण भारतात इतर मागास प्रवर्गातून 2224 वी व जनरल मधून 11254 वी रँक मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
तन्मय हा प्राथमिक शिक्षक मारुती वाघ व प्रतिभा वाघ यांचा मुलगा असून, आई-वडिलांचे व बहिणीचे प्रोत्साहन मला या यशापर्यंत घेऊन आले हे तो नमूद करतो.
तसेच पेंटागॉन करियर इंस्टिट्यूट श्रीरामपूरचे प्रा. प्रमोद निर्मळ, प्रा. तोफिक शेख प्रा. सुजित वाकचौरे व प्रा. मंगेश रसाळ यांच्या मार्गदर्शनाचा माझ्या यशात सिंहाचा वाटा असल्याचे तो सांगतो.
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे यावर्षी आय.आय.टी. प्रवेशासाठीची जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा थोड्याशा उशीराने अर्थातच सप्टेंबरमध्ये घेण्यात आली.
संपूर्ण भारतातून बारा लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातून श्रीरामपूरसारख्या तालुकास्तरातून तन्मय मारुती वाघ या विद्यार्थ्याने ओबीसी प्रवर्गातून 2224 वी रँक मिळवून विशेष यश संपादन केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved