अहमदनगर बातम्या

अहमदनगर मध्ये विजेचा शॉक बसून तरुणाचा अकस्मात मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर : येथे राहत्या घरात विजेचा शॉक बसून ३० वर्षीय तरुणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथे मंगळवारी (दि.९) सकाळी घडली. अक्षय श्रीमंत गोरे (रा. रुईछत्तीसी, ता. नगर) असे मयत तरुणाचे नाव आहे.

अक्षय गोरे हा राहत्या घरात काम करत असताना त्याला मंगळवारी (दि.९) सकाळी विजेचा शॉक बसला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला बेशुद्धावस्थेत त्याचे नातेवाईक गणेश विष्णू गोरे यांनी उपचारासाठी सकाळी १०.१७ वाजता जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले.

तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. तशी खबर वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघ यांनी रूग्णालयात ड्यूटीवर असलेले तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार जठार यांना दिली.

अंमलदार जठार यांनी दिलेल्या खबरीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाच्या असे अकस्मात जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office