अहमदनगर बातम्या

शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून नुकसान !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : ऊसाच्या क्षेत्रा जवळून गेलेल्या विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे ऊसाचे अर्धा एकर क्षेत्र जळाल्याने शेतकऱ्याचे सव्वा लाखाचे नुकसान झाले. कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात नुकतीच ही घटना घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येसगाव येथील नानासाहेब लक्ष्मण गायकवाड यांची येसगाव शिवारात सर्वे नंबर ९९ मध्ये अर्धा एकर ऊसाचे क्षेत्र आहे. या क्षेत्रात ड्रीप पसरवलेले आहे. या क्षेत्रात तोडणीला आलेला ऊस होता.

त्या क्षेत्रा जवळील दुसऱ्या शेतातून विद्युत तारा गेलेल्या आहे. मात्र या तारांना जास्त झोळ असल्याने त्या एकमेकांना घर्षण झाल्याने आगीचा लोळ खाली जमिनीवर पडला. त्या ठिकाणी सोंगलेल्या गव्हाचे काड होते.

त्या काडाने पेट घेत आगीने रौद्ररूप धारण करीत शेजारील गायकवाड यांच्या ऊसालाही आपल्या कवेत घेतले. शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. दरम्यान सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या अग्नीशमक बंबाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.

तोपर्यंत सर्व ऊस व त्यात पसरविलेले ड्रिप संपूर्ण जळून खाक झाले. या घटनेत नानासाहेब गायकवाड यांचे सव्वा लाखांचे नुकसान झाले असून येसगाव महावितरणच्या अधिकाऱ्यांसह महसूल व पोलीस ठाण्यात सदर घटनेची तक्रार केल्याचे शेतकरी नानासाहेब गायकवाड यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office