शॉर्ट सर्किटमुळे ऊस जळून खाक; शेतकर्‍यांला आर्थिक भुर्दंड

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  राजुरी येथील एका शेतातील उसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

यामुळे बळीराजावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. अधिक महिती अशी कि, या अग्निकांडात राजुरी हद्दीतील अनिकेत चारुदत्त गोरे, मनिषा चारुदत्त गोरे, यांच्या 65 गुंठे ऊस व जैन कंपनीचे ठिबक संच जळून नष्ट झाले.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

तर शिवाजी बाळासाहेब गोरे यांचे 60 गुंठे ऊस व जैन कंपनीचे ठिबक संच जळाला. भाऊसाहेब बंडू गोरे यांचे 40 गुंठे तसेच अनुसाया मुरलीधर गोरे 40 गुंठे ऊस जळून खाक झाला आहे.

दरम्यान राजगुरू ट्रान्स फार्म कडे जाणार्‍या 11 के व्ही मेन लाईनवर अचानक बार झाल्याने खाली असलेल्या उसाने पेट घेतला व शेजारील 4 ते 5 एकर ऊस पेटत चालला.

आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील तरुण धावून आले व आग आटोक्यात आणली. तसेच गणेश कारखान्याच्या अग्निशमक बंबाने आग विझवली.

अगोदरच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकर्‍यावर विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किटमुळे ऊस व ठिबक संच जळाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट आले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.