कोल्हार येथे उसाला आग; साडेचार लाखांचे नुकसान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,6 जून 2020 : कोल्हारजवळ असलेल्या रानशेंडा येथे मोटार केबलच्या शॉर्टसर्किटमुळे उसाच्या पिकाला आग लागण्याचा प्रकार घडला आहे.

या आगीमुळे तीन एकर उसातील ठिबक सिंचनचे सुमारे साडेचार लाखांचे नुकसान झाले.

कोल्हार येथील रानशेंडा परिसरात वसंत गणपत खर्डे यांचे तीन एकर उसाचे क्षेत्र आहे.

यातील २८४ /अ मधील ऊस शेतीत अचानक आग लागल्याने उसातील खोडवा असलेला भाग, ठिबक सिंचन आगीत जळून खाक झाले.

आग मध्यरात्री लागल्याने वेळीच आग आटोक्यात आणणे अशक्य झाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24