अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने ऊसाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव तालुक्यात जोरदार हजेरी लावली. या पावसाने तालुक्यातील ऊस पिके पडल्याने नुकसान झाले आहे.
साखर कारखाने सुरू होण्यास दोन महिने अवधी असून त्यानंतर लागवड तारखेप्रमाणे नंबर येण्यास किती महिन्यांचा अवधी जाणार हे सांगता येत नाही. पडलेली ऊस पिके पुन्हा उभी राहणे शक्य नाही.
त्यामुळे पढेगाव येथील ऊस उत्पादक शेतकर्यांनी या परिस्थितीत तालुक्याची धुरा सांभाळणारे काळे आणि कोल्हे या दोन्ही नेत्यांनी शेतकर्यांना तातडीची मदत करावी अशी मागणी केली आहे.
दरवर्षी तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप करतात.
या कारखान्यांमुळे राज्यात सहकार क्षेत्रात कोपरगाव तालुक्याने नावलौकिक मिळविला आहे. यंदा मातीशी गाठ पडलेल्या ऊसाला अळ्यांचा प्रादुर्भाव पोखरणार असल्याने शेतकर्यांची मोठी हानी होणार
असल्यामुळे याशिवाय ऊसाचे पिकासाठी नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात येत नसल्यामुळे यातुन सावरण्यासाठी बेणे खर्च आणि मशागत खर्चापोटी किमान एकरी दहा हजार रुपयांची तातडीने मदत करावी अशी पढेगाव
येथील ऊस उत्पादक शेतकरी यांनी केली आहे. या आठवड्यात सलग दोन दिवस झालेल्या वादळी पावसाने मोठ्या हिमतीने आणि मेहनतीने उभे केलेले ऊसाचे पिक भुईसपाट झाले असुन
साखर कारखान्यांकडे शेतकर्यांनी नोंदवलेला देखील आहे.मात्र कारखान्याचे गाळप सुरु होण्यास वेळ असुन, तोपर्यंत या ऊसाचे पाचट आणि खोडकी होण्याची शक्यता आहे अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved