अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2020 :-वृध्देश्वर कारखान्याचे गाळप सुरू होऊन गेली दीड ते दोन महिने झालेत. मात्र अजुन ऊस दराची कोंडी कायम आहे.गेल्या वर्षी कारखान्याने २३०० रूपाय पर्यंत टनाला भाव दिला होता.
ह्या वर्षी देखील त्यापेक्षा जास्त दर देणं अपेक्षीत होतं. कार्यक्षेत्रात ह्यावर्षी ऊसाचे पीक चांगले आहे. कार्यक्षेत्रातील ऊस तोंडणीला प्रथम प्राधन्य देण्यात यावे.
आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक पवार यांना दर वाढीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपध्यक्ष रमेश कचरे व पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मरकड यांच्या नैतृत्वात देण्यात आले.