अहमदनगर बातम्या

श्रीगोंदा तालुक्यात १४ हजार 102 हेक्टरवर ऊस उभा! ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांकडून ऊसतोड कामगारांच्या विनवण्या

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्ह्यात बघितले तर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली असून राजकीय वातावरण तसे आता शांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु शेत शिवारातील वातावरण मात्र आता ऊस तोडीचे निमित्ताने गरमागरम झाल्याचे दिसून येत आहे.

निवडणुकीची धावपळ संपत नाही तोच आता ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांची लगबग आणि धावपळ सुरू झाल्याचे चित्र श्रीगोंदा तालुक्यात दिसून येत आहे. श्रीगोंदे तालुक्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगामाला सुरुवात झाली असून ऊसतोड कामगारांच्या टोळ्या देखील आता परिसरात दाखल झालेले आहेत.

त्यामुळे आता प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून आपला ऊस लवकरात लवकर तुटून कारखान्यास जावा याकरिता धावपळ होताना दिसून येत आहे.

त्यामुळे साहजिकच ऊसतोड कामगारांच्या विनंत्या शेतकऱ्यांना मात्र आता कराव्या लागत आहेत.तालुक्यामध्ये उसाचे 14 हजार 102 हेक्टर क्षेत्र असून तालुक्यातील कारखान्यांची संख्या पाहता उसाची टंचाई यावर्षी जाणवेल अशी एक शक्यता आहे.

ऊस तोडणीसाठी ऊसतोड कामगारांकडे शेतकऱ्यांच्या चकरा
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि आता श्रीगोंदा तालुक्यात ऊसतोड कामगार देखील दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून ऊस लवकरात लवकर तुटावा आणि तो कारखान्याला जावा याकरिता धावपळ सुरू असून ऊसतोड कामगारांकडे शेतकऱ्यांच्या चकरा वाढल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी जर आपण कारखान्यांचा गाळप हंगाम बघितला तर तो निवडणुकांमध्ये उशिरा सुरू झाला आहे. आधीच उशीर झाल्यामुळे शेतकरी आपला ऊस लवकरात लवकर तुटून कारखान्याला जावा यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु ऊस तोड कामगारांच्या टोळ्यांची संख्या कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर ऊस तोड कामगारांची टोळी मिळत नसल्याचे चित्र आहे.

त्यामुळे आता शेतकऱ्यांचे कारखाना आणि ऊसतोड कामगारांकडे चकरा सुरू झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर बऱ्याच साखर कारखान्यांच्या ऊसटोळ्या दाखल झालेल्या असून बऱ्याच ठिकाणी ऊस तोडणी देखील सुरू झालेली आहे.

परंतु श्रीगोंदा तालुक्यातील अनेक भागांमध्ये टोळ्यांची कमतरता असून ऊस तोडणीला उशीर होण्याची शक्यता आहे. ऊस तोडायला जर उशीर झाला तर उसाच्या वजनात घट होऊन त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांची सध्या धावपळ होताना दिसून येत आहे.

गाळप हंगाम उशिरा सुरू झाल्याने जास्त दिवस गाळप चालणार?
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितले तर श्रीगोंदे तालुक्यातील साखर कारखान्यांनी यावर्षीचा गाळप हंगाम उशिरा सुरू केलेला आहे. तसेच तालुक्यामध्ये बाहेरच्या तालुक्यातील साखर कारखान्याचे ऊसतोड कामगार आलेले आहेत.

आपण पाहिले की श्रीगोंदा तालुक्यात सध्या 14 हजार 102 हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड आहे. आधीच हंगामाला उशीर झाल्यामुळे यंदाचा गाळप हंगाम जास्त दिवस चालण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil