मुस्लिम कब्रस्तानच्या खोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील अशपाक गुलजार पठाण (वय २१) याने शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन मामाच्या घरात आत्महत्या केली. सदर मृत युवक टाकळीमिया येथील कारवाडी परिसरात आपल्या आईसमवेत राहत होता.

दररोजच्या प्रमाणे मुलगा घरी आला नाही म्हणून त्याचा गावात शोध घेत असता मुस्लिम कब्रस्तानच्या खोलीत अश्फाक याने गळ्याला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती ताबडतोब पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. मात्र, या मुलाने आत्महत्या का केली? या प्रश्नांची गावात उलट सुलट चर्चा होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24