अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील सुभाषनगर येथील वाल्मिक दगडू आवारे (वय ३४) या तरुणाने गोदावरी नदीपात्रात आत्महत्या केली. नदीकाठालगत दत्तपाराजवळ त्याचा मृतदेह आढळला.
आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. आवारे काही महिन्यांपूर्वी नगरपरिषदेत आरोग्य विभागात कामाला होता. दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता.
त्याच्यामागे आई, वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. हेडकॉन्स्टेबल एस. एच. गायमुखे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved