अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर शहरातील सावेडी नाका येथे राहणाऱ्या रोशन रामकृष्ण माळी (२९, मूळ नाशिक) या उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या प्रकरणी तोफखाना पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. माळी नगरच्या एमआयडीसीतील एका कारखान्यात नोकरीला होते.
त्यांचे ११ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. कंपनीचे लोक व मित्रांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी दार उघडले त्यावेळी त्याचा मृतदेह आढळून आला.