अहमदनगर बातम्या

‘सुजय विखेंना अजित दादांकडे घेऊन जातो, त्यांनी लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवावी’, विखेंना राष्ट्रवादीत आणण्यासाठी आ. जगतापांच्या हालचाली

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगरच्या राजकारणात अलीकडील काळात भाजप खा. सुजय विखे व राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांच्यात चांगलेच सूर जुळले आहेत. विखे यांच्या अनेक कार्याक्रमांत जगताप उपस्थित असतात.

खा. सुजय विखे यांनी जगतापांना भाजपात येण्याचं आमंत्रण दिल होत. परंतु आता या आमंत्रणावर आमदार संग्राम जगताप यांनी प्रतिक्रिया दिली असून विखे यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय.

काय म्हटलं आहे आ. संग्राम जगताप यांनी ?

खासदार सुजय विखे यांनी हे जे मला भाजप येण्याचं आमंत्रण दिल ते एक विनोद होता. आमचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार हे भाजपबरोबर सत्तेत आहेत. त्यामुळे माझा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्न येतच नाही असे जगताप म्हणाले.

पुढे ते असंही म्हणले की, खा. विखे यांनीच राष्ट्रवादीमध्ये आता यायला हवे. आणि हे आमंत्रण विनोद नव्हे तर गांभीर्याने देत आहे. राष्ट्रवादीचे नगर जिल्ह्यात वाढते संघटन आणि खासदार विखेंचे काम करण्याची पद्धती पाहिली तर आगामी लोकसभा विखे हे राष्ट्रवादीकडून लढले तर त्यांना फायदा होईल. अजित पवार यांच्याकडे मी त्यांना घेऊन जातो. त्यांनी पूर्वी राष्ट्रवादीमध्ये येण्याचा प्रयत्न केलाय हे सर्वांनाच माहिती आहे. असेही आमदार जगताप यांनी म्हटलंय.

भाजप-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत संभ्रम

विखे यांच्या आ. जगतापांना भाजपमध्ये येण्याच्या आमंत्रणाने भाजप संघटनेमध्ये अस्वस्थता पसरली होती. आता जगताप यांनी विखेंना राष्ट्रवादीचे आमंत्रण दिलेय. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत या दोन नेत्यांचे नेमके चाललेय काय ? असा संभ्रम निर्माण झालाय.

मंत्रीपदाचे सूतोवाच

दसऱ्याच्या दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यात राष्ट्रवादीच्या वाट्याला काही मंत्रिपद येतील असेही सांगतिले जात आहे. यावर भाष्य करताना जगताप यांनी म्हटलं आहे की, आता सध्या मी काम करत आहे.

मंत्रिपद भेटल्यास कामाचा वेग डबल वाढणार आहे. मात्र, मंत्रिपदावर संधी मिळेल की नाही हे मात्र निश्चित सांगू शकत नाही. या वक्तव्याने त्यांनी एकप्रकारे मंत्रिपदासाठी सूतोवाच केले आहे.

Ahmednagarlive24 Office