‘त्यांनी’ आमदारपदाचा दर्जाच घालवला सुजित झावरे यांची टीका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये माझ्या वासुंदे गावांसह अनेक ग्रामपंचायतींमध्ये आमदार स्वत: बूथवर बसून राहणे, पहाटे २ ते ३ वाजेपर्यंत गावात प्रचार करणे, हे तालुक्याचे दुर्दैव आहे.

अशी टीका सुजित पाटील झावरे यांनी आमदार लंके यांच्यावर केली आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधींनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करणे हे त्यांच्या पदाला साजेशे नाही.

आणि म्हणून या तालुक्याने आमदारांच्या हुकूमशाहीला ग्रामपंचायत निवडणूकीत स्पष्टपणे नाकारले असल्याचे सुजित पाटील झावरे यांनी टीका केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24