अहमदनगर बातम्या

उपोषणकर्ते खासदार निलेश लंके यांच्या मागण्यांबाबत पोलिस अधीक्षकांचा मोठा खुलासा ..!

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : पोलीस निरीक्षकांवरील कारवाईचा अधिकार मला नाही, तो वरिष्ठांना आहे. फक्त अहवाल पाठविण्याचा अधिकार मला देण्यात आला आहे. त्यामुळे ज्या काही तक्रारी आहेत, त्या लेखी स्वरूपात द्या.

त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत त्यांची चौकशी करू. दरम्यान, तुमचा जर या अधिकाऱ्यांवरही विश्वास नसेल तर वरिष्ठ अधिकारी आयजी यांच्याकडेही चौकशीची मागणी तुम्हाला करता येईल, विनाचौकशीची कारवाई करण्यास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नकार देत आपली भूमिका स्पष्ट केली.

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस प्रशासनाचे चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. तसेच मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे, असा आरोप करत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर दुसऱ्या दिवशी सुरु असलेले खा. लंके यांचे आंदोलन थांबविण्यासाठी त्यांच्या शिष्टमंडळांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करावी, त्यांची बदली करावी, अशी मागणी केली.

त्यावर पोलीस अधीक्षकांनी याबाबत कुठलीही तक्रार किंवा अर्ज आला नाही. तक्रार अर्ज आला तर त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केल्यानंतर जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. विनाचौकशी कारवाई करण्यास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नकार दिला.

पोलीस प्रशासनाविरोधात दुसऱ्या दिवशीही सुरु असलेले खासदार नीलेश लंके यांचे आंदोलन थांबविण्यासाठी जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची दुपारी भेट घेतली. यावेळी काही निवडक कार्यकर्ते पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात उपस्थित होते.

यावेळी खा. लंके यांनी सुरु केलेल्या आंदोलनाची दखल घेत संबंधितावर कारवाई करावी तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांची बदली करावी, अशी मागणी करण्यात आली.

पोलीस अधीक्षक म्हणाले, त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यांच्या मागणीनुसार तक्रार द्या, चौकशी करून त्यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. तक्रार दिल्यावर त्यांची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करू. जिल्ह्यात दोन अप्पर पोलीस अधीक्षक आहेत.

नगर व दुसरे श्रीरामपूर येथे आहेत. त्यांच्याकडे चौकशीची जबाबदारी देऊ, असे सांगितले. मात्र, विनाचौकशीची कारवाई करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पोलीस निरीक्षकांवरील कारवाईचा अधिकार मला नाही, तो वरिष्ठांना आहे. फक्त अहवाल पाठविण्याचा अधिकार मला देण्यात आला आहे.

त्यामुळे ज्या काही तक्रारी आहेत, त्या लेखी स्वरूपात द्या, असे पोलीस अधीक्षक ओला म्हणाले. दरम्यान, तुमचा जर या अधिकाऱ्यांवरही विश्वास नसेल तर वरिष्ठ अधिकारी आयजी यांच्याकडेही चौकशीची मागणी तुम्हाला करता येईल, असे त्यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office