खासदार लोखंडे यांच्या अहमदनगरच्या नामांतर मागणीस पाठिंबा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करावे या खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मागणीस दीनदयाळ परिवाराने पाठिंबा दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवून अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी केली आहे,

अशी माहिती दीनदयाळ परिवाराचे संस्थापक वसंत लोढा यांनी दिली. या संदर्भात सर्व पक्षीय समविचारींची बैठक खासदार लोखंडे यांच्या उपस्थितीत होणार असल्याचेही लोढा यांनी सांगितले. अहमदनगरचे नाव अंबिकानगर व्हावे ही अनेक वर्षांपासूनची नगरकरांची मागणी आहे.

केडगावची अंबिकादेवी ही नगर शहराची कुलदेवता आहे. आता खासदार लोखंडे यांनीही नामांतराची मागणी कल्याने या मागणीला जोर आला.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला. त्याचप्रमाणे नगरचे नामांतर व्हावे यासाठी राज्य सरकारने अंबिकानगर या नामांतर मागणीचा विचार करून त्वरित निर्णय घ्यावा.

निवेदनावर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, प्रा. मधुसूदन मुळे, अनिल शर्मा, हरिभाऊ डोळसे आदींच्या सह्या आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24