Ahmednagar News : गावाने मला सरपंच पदाची संधी दिल्याने आपण गावाचा विकास करू शकले, हे विकासकामे काही समाजकंटकांना जिव्हारी लागल्याने मध्यरात्रीला १० ते १५ जणांच्या टोळक्याने आमच्या घरी येऊन अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील असल्यानेच आमच्यावर अन्याय होत असल्याने आमचे घरावर भ्याड हल्ला केल्याची तक्रार कोळगावथडीच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच मीनल चंद्रशेखर गवळी यांनी पोलिसांना दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी या ठिकाणी मोठेबाबा मच्छिद्रनाथ हे ऐतिहासिक मंदिर असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठेबाबा यात्रोत्सव जातीय सलोखा ठेवून मोठ्या उत्साहत साजरा करण्याची तयारी झाली होती.
परंतु काही गावातील समाजकंटकांनी मध्यरात्री सरपंचांच्या घरी जाऊन यात्रोत्सव मध्ये बँजो लावला नाही, मोठेबाबा मंदिराची स्वच्छता चांगली केली नाही, हे निमित्त साधून मध्यरात्रीला १० ते १५ समाजकंटकांनी मद्यधुंद अवस्थेत महिला सरपंचाच्या घरी जाऊन हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी मोठ-मोठ्याने ओरडून शिवराळ व अश्लील भाषेत दमबाजी करून जिवे मारण्याची धमकी दिली याबाबत गवळी म्हणाल्या, यात्रोत्सव कमिटी मध्ये माझे पती चंद्रशेखर गवळी खजिनदार आहे. म्हणून यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना धक्काबुक्की केली.
तु यात्रा उत्सव समितीचा खजिनदार आहे. तुला समजले नाही. का बँजो लावायचा आम्हाला नाचायचे आहे. तुझी बायको लय शायनिंग मारते. या गोष्टी महागात पडतील. असा दम देणाऱ्या व यात्रा उत्सवाचा शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी.
मोठेबाबा यात्रोत्सवाचे कमिटीचे व देवस्थानचे फ्लेक्स बोर्ड वाढून त्यांची विटंबना केल्याने आमच्या जीविताला धोका असून तसेच आमच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे, असे त्यांनी सांगितले. घटनास्थळी कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी,
पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे, सहाय्यक फौजदार गजानन दांडेकर, पोलीस नाईक किसन सानप आदींनी भेट दिली. या प्रकरणी संबधीत समाजकंटकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यात्रोत्सवाचे फ्लेक्स बोर्ड फाडणे, मध्यरात्रीला महिला सरपंच यांच्या घरी १० ते १५ समाजकंटक जाऊन यात्रा उत्सवातील समस्याचे राहिल्याचे कारण सांगून अश्श्रील भाषा वापरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
जिवे मारण्याची धमकी देऊन गावाचा व मोठेबाबा यात्रोत्सवात शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर वेळीच बंधने घातले नाही तर ते उद्या कायदा हातात घेऊन मोठा गुन्हा घडवू शकतात. ही शक्यता नाकारता येत नसल्याने या समाजकंटकावर कडक कारवाई करावी, अशी मागणी पोलीस पाटील कांचन दिपक राऊत यांनी केली आहे.