अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी राहुरी शहर व तालुक्यात सारी या आजाराचा सर्वे सुरू करण्यात आला आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा अधिकारी आमिषा मित्तल, तहसीलदार शेख यांच्या नेतृत्वाखाली हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
सर्वेसाठी आलेल्या नगरपालिका ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, तसेच शिक्षकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे.
या सर्वेमध्ये तालुक्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक नागरिकाची थर्मल स्कॅनर ऑक्सी प्लस मीटर या यंत्राद्वारे ताप व नाडीचे ठोके यांची तपासणी करण्यात येणार आहे.
शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यात येते. तसेच सर्दी खोकला ताप अशी लक्षणे दिसल्यास त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येते.
हा सर्वे ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.वर्षा डोईफोडे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, मुख्य अधिकारी श्रीनिवास कुरे यांच्या देखरेखीखाली करण्यात येत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews