अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात मतदानप्रक्रिया पार पडली तसेच निकाल देखील घोषित झाला आहे. मात्र आता एक नवीनच प्रकारामुळे काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे.
लोणीमध्ये यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत फक्त ईव्हीएम मशीन वापरून मतदान घेण्यात आले. मतदाराने कोणाला मतदान केले, हे समजण्यासाठी वापरण्यात येणारी व्ही.व्ही. पॅटमशीन ग्रामपंचायत निवडणुकीत वापरण्यात आले नाही.
त्यामुळे आम्ही केलेले मतदान आम्हाला अपेक्षित उमेदवाराला झाले की नाही, याबाबत संशय निर्माण होतो. तरी निवडणूक आयोगाने याबाबत सक्षम अधिकाऱ्यामार्फत योग्य तो खुलासा करावा,
अशी मागणी वैदू समाज राज्य संघटनेचे राज्य कार्यकारीणी सदस्य मच्छिंद्र लोखंडे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन लोखंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य तो खुलासा करावा, अन्यथा याप्रश्नी न्यायालयात याचिका दाखल करून न्याय मागू, असे निवेदनात लोखंडे यांनी शेवटी म्हटले आहे.