‘त्या’ वृद्धाचा संशयास्पद मृत्यू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- कर्जत तालुक्यातील भोसे येथील वृद्धाचा संशयास्पद मृत्यूबाबत कर्जत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गुरूवारी रात्री साहेबराव मुक्ताजी चव्हाण (वय ७०) हे पडवीत झोपले होते.

पहाटे तीन वाजता त्यांची सून पाणी पिण्यासाठी उठली असता चव्हाण हे खाली पडलेले दिसले. त्यांच्याजवळ जाऊन पाहिले असता नाका-तोंडाजवळ रक्त दिसल्याने त्यांना कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिस पाटील मधुकर चव्हाण यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24