संशय वाटल्याने पोलिसांनी भरधाव वेगाने जाणारी कार अडवली आणि सापडली ‘ही’ वस्तू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :-  ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने कर्जत तालुक्यात पोलिस गस्त करीत असताना दि.१८ रोजी सायंकाळी साडे आठच्या सुमारास बारडगाव-राशीन रस्त्यावर टाटा सफारी (एम. एच.१२ जीके ३७७१) ही भरधाव वेगाने राशीनच्या दिशेने जाताना पोलिसांना दिसली.

याबाबत संशय वाटल्याने पोलिसांनी धुमकाई फाटा या ठिकाणी सदरचे सफारी वाहन अडवले असता या गाडीत फक्त वाहन चालवणारा इसम होता, त्यास नाव विचारले असता त्याने आपले नाव उमेश भाऊसाहेब म्हस्के (वय-३७ वर्ष रा.तळवडी ता.कर्जत) असे सांगितले.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता, मधल्या बाकावर एक लोखंडी तलवार मिळून आल्याने पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोकॉ. गणेश ठोंबरे यांच्या फिर्याद दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोहेकॉ. तुळसीदास सातपुते, पोकॉ. सचिन वारे यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24