सुवर्णा कोतकर यांच्या जामीन प्रकरणी ‘ह्या’ दिवशी होणार निर्णय !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :-माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांच्या अंतीम जमीन प्रकरणी निर्णय न्या. शेटे यांनी राखून ठेवला .

केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी या पूर्वी झालेल्या सुनावणीत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला होता. शिव सैनिक वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांचा केडगाव येथील मनपाच्या पोटनिवडणुकी दरम्यान खून झाला होता.

त्यात सुवर्णा कोतकर याही आरोपींच्या यादीत होत्या. गुन्हा घडल्यापासून आजतागायत त्या फरार आहेत. या गुन्ह्यात दाखल केलेल्या चार्जशीट मध्येही त्यांना फरार घोषित करण्यात आलं होत.

या प्रकरणी न्या.शेटे यांच्या समोर सुनावणी झाली त्यात कोतकर यांची बाजू ॲड. नितीन गवारे पाटील (हाय कोर्ट ) यांनी मंडळी ह्या प्रकरणी न्या. शेटे यांनी निकाल राखून ठेवला असून त्याचा निर्णय मंगळवारी देण्यात येणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24