अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- अहमदनगर महापालिके च्या वतीने करण्यात येणाऱ्या संभाव्य कोरोना संशयितांची स्वॅब चाचणी आता सशुल्क करण्यात आली आहे व शासन निर्धारित दराने नागरिकांकडून आकारण्यात
येणार्या शुल्कास अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने विरोध करण्यात येत असून आधिच लॉकडाउन मुळे आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या सर्व सामान्य नागरिकांना हा भार पेलवणारा नाही.
तेव्हा महापालिका प्रशासनाने याचा विचार करून सदर स्वॅब शुल्क आकारणी तातडीने रद्द करावी अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
महापालिकेने जरी सदर स्वब तपासणी केंद्र खाजगी लॅब ला चालविण्यास दिले असले तरी सदर खाजगी लॅब मध्ये होणाऱ्या अहमदनगर शहरातील नागरिकांच्या स्वॅब तपासणी शुल्क महापालिकेने अदा करावे
अशी मागणी शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. त्या साठी महापालिका प्रशासनाने विषेश निधीची अथवा पर्यायी व्यवस्था करावी,
ही विनंती. अपुऱ्या स्वॅब तपासणी क्षमतेमुळे चार पाच दिवस रुग्णांना अहवाल मिळत नाही ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. हजार पेक्षाही अधिक स्वॅब तपासणीसाठी प्रलंबित आहेत.
त्यामुळे होणारा अक्षम्य विलंब हा संभाव्य कोरोना रुग्णाच्या औषधोपचारच्या दृष्टीनेन अत्यंत धोकादायक आहे हे प्रशासनाने ध्यानात घेऊन
तातडीने स्वॅब तपासणी वेग वाढवून रुग्णाला किमान आठ तासांत तपासणी अहवाल उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी शहर जिल्हाः कॉंग्रेस पक्षाच्या वतीने उपाध्यक्ष बाळासाहेब भंडारी यांनी व्हाॅटसअप निवेदनाद्वारे मा.
महापालिका आयुक्त यांचेकडे केली आहे.तसेच मा. महापौर व सर्व लोक प्रतिनिधींनी यात तातडीने लक्ष घालून महापालिकेस निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी ही विनंती करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com