अहमदनगर बातम्या

Ahmednagar News जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन प्रगतिपथावर…! १४९ सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम पूर्ण तर ८१ कामे अंतिम टप्प्यात

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : जिल्ह्यातील हागणदारीमुक्तीचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी तालुक्यात स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागात २३० सार्वजनिक शौचालये मंजूर करण्यात आली आहेत.

त्यानुसार ग्रामीण भागात धार्मिक स्थळ, बाजारतळ, पर्यटनस्थळ, सार्वजनिक ठिकाणे व इतर गर्दीच्या ठिकाणी स्वच्छतेचे सातत्य राहावे, यासाठी सार्वजनिक शौचालय मंजूर केले करण्यात आले आहेत. त्यातील १४९ शौचालये पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित ८१ ठिकाणची कामे प्रगतिपथावर असल्याचे संबंधित विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तीक व सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात सार्वजनिक शौचालयांना प्रत्येकी ३ लाख या प्रमाणे निधीला मंजूरी देण्यात आली आहे.

गर्दीच्या ठिकांनी सार्वजनिक शौचालयांची आवश्यकता असल्यास संबंधित ग्रामपंचायतीने पंचायत समितीला प्रस्ताव सादर केल्यास त्यास मंजुरी दिली जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले. जिल्ह्यात उर्वरित प्रगतिपथावर असलेले ८१ सार्वजनिक शौचालये लवकर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी

जिल्ह्यात २३० सार्वजनिक शौचालयांपैकी अकोले-१९, कर्जत -४, जामखेड-७,नगर-१२, नेवासा-८, पाथर्डी-१५, राहाता-११, राहुरी-३, शेवगाव-१०, श्रीगोंदा-९, श्रीरामपूर-९, पारनेर-१९ अशा १४९ सार्वजनिक शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत.

Ahmednagarlive24 Office