‘हा’जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करावा ! ‘या’ माजी महापौरांची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- राज्यात कोरोनाचे संकट आता कमी होताना दिसत आहे. त्याच बरोबर सरकार आता सर्व सुरु करण्याची परवानगी देत आहे.

परंतु अजूनही वाडिया पार्क येथील जलतरण तलाव बंद आहे. तरी तो तलाव सुरु करण्यात यावा. अशा मागणीचे निवेदन माजी महापौर भगवान  फुलसौंदर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळासह व नागरिकांसह दिले आहे.

यावेळी बोलताना फुलसौंदर  म्हणाले कि, आता एसटीबस ,सिनेमागृह आदी विविध पूर्ण क्षमतेने सुरु झाले आहेत. तर मग जलतरण तलाव का नाही सुरु होत.

सध्या कोविड पासून बंद असलेला या जलतरण तलावाचे अनेक वार्षिक सभासद आहेत. त्यामध्ये अनेकजण विविध आजाराने ग्रस्त आहेत,

अशा वेळी तलाव बंद असलेने त्यांना अनेक आरोग्य समस्यना सामोरे जावे लागते, तरी हा जलतरण तलाव लवकरात लवकर सुरु करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24