जमिनीच्या वादातून तलवारीने वार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यात घोसपुरी येथे राहणारे शेतकरी विठोबा जयसिंग भोसले, वय ४१ यांना साडेसातच्या सुमारास पाच आरोपींनी मेंढपाळ व शेतीच्या वादातून तलवाऱीने वार करुन गुप्तीने भोसकून गज डोक्यात मारुन दगड मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

या मारहाणीत विठोबा जयसिंग भोसले हे गंभीर जखमी झाले असुन त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे आरोपी गोरख जयर्सिंग भोसले, विकास हरिभाऊ भोसले, आकाश गोरख भोसले, सरूबाई उर्फ मीनाक्षी भोसले,

चिकूबाई गोरख भोसले सर्व स. घोसपुरी, ता. नगर यांच्याविरुद्ध नगर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी डीवायएसपी प्रांजली सोनवणे यांनी भेट दिली. पोसई राऊत हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24