बिनविरोधासाठी प्रलोभने दाखविणाऱ्या आमदारांवर कारवाई करा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जानेवारी 2021 :- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी निवडणूक या होणारच आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकांमध्ये बिनविरोधासाठी लोकप्रतिनिधींनी मोठी धावपळ केली.

तसेच याप्रसंगी गावकऱ्यांना आर्थिक प्रलोभने देखील दाखवली यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्यासाठी 25 लाख रुपयांचे आमिष दाखविणारे आ. रोहित पवार, आ. निलेश लंके,

आ. बबनराव पाचपुते यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जिल्हाधिकार्यांना देवूनही अजून कारवाही झाली नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करू तसेच या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे यांनी दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांनी या तीनही आमदारांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाने दखल घेवून या आमदारांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले होते जिल्हाधिकार्‍यांनी याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाला दिला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सध्या 767 ग्रामपंचायती निवडणूक जाहीर झालेली असताना ठिकाणी निवडणुका बिनविरोध करण्यावर भर दिला जात आहे. या विषयावर स्थानिक आमदार ग्रामपंचायतींना 10 लाख ते 30 लाख असे आमिष दाखवून सदर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा प्रयत्न करीत आहेत तसे जाहीर आव्हान त्यांनी वर्तमानपत्राद्वारे सुद्धा केले आहे,

अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे आदर्श आचार संहितेचा भंग तर आहेच तसेच लोकशाहीचा खून आहे. पैशाचे प्रलोभन दाखवून निवडणुका बिनविरोध करणे हे घटनाबाह्य असून धनदांडग्या व प्रस्थापित नेत्यांच्या फायद्याचे आहे

ग्रामपंचायतीची निवडणूक ही मोठ्या संघर्षाची असते गावागावात मतभेत आणि गावाचा खुंटलेला विकास हे स्थानिक आमदार माहित असून देखील ते समाजातील वंचित घटकांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.

कारण वंचित समूह हा पैशाची राजकारण करू शकत नाही हे माहीत असल्यामुळे काही आमदार पैशाच्या व सत्तेच्या जोरावर वंचितांची मुस्कट दाबी करत आहेत,

ज्या लोकप्रतिनिधींनी निवडणुका प्रभावित करण्यासाठी पैशाचे आमिष दाखवले आहे, त्यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करून निवडणूक आयोगाने सदर वक्तव्य करणार्‍या आमदारांचे पद रद्द करुन टाकावे अशी मागणी वंचित आघाडी ने केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24