अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- पारनेर येथील महिला तहसीलदार ज्योती देवरे यांच्याशी अश्लिल भाषेत संभाषण करून विनयभंग केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न्याय मागितला आहे.
सदर प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर व पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तहसीलदारांच्या बाबतीत निंदनिय घटना घडलेली असतानाही तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ केली
त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे यांनी तहसीदार ज्योती देवरे यांना गुरुवारी (दि. 17) त्यांच्या दालनात येऊन मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा करून त्यांच्यासमोर अश्लील भाषेत शिविगाळ करून बेईज्जत केले.
त्यांच्त्यावर आरोप करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. त्याचप्रमाणे देवरे या कोव्हिड आजाराच्या उपचारार्थ रुग्णालयात असताना भ्रमणध्वनीव्दारे अश्लील शिविगाळ केली तसेच दरमहा खंडणी देण्याबाबत धमकविले असे म्हटले आहे.
‘सुप्रिया झावरे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करा ‘
सुजीत झावरे यांच्या आई सुप्रिया झावरे या सद्यस्थितीत टाकळी येथील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्यांच्याकडून तहसीलदार ज्योती देवरे यांच्यावर खोट्या तक्रारी करून त्यांना अडचण निर्माण करण्याबाबत सुजित झावरे यांनी धमकावले आहे.
त्या माध्यमातून देखील देवरे यांच्या खोट्या तक्रारी करून त्यांना त्रास देण्याची व त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुप्रिया झावरे यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व तात्काळ रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved