जातीय तेढ निर्माण करणाऱ्यावर कारवाई करा, विविध संघटनांचे प्रशासनाला निवेदन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- ख्रिस्ती व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावून समाजात जातीय तेढ निर्माण करणारा सुरज आगे याच्यावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्याला अटक करावी.

या मागणीसाठी आज दिनांक ४ ऑक्टोबर रोजी राहुरी येथील अनेक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महसूल व पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. रेव्हरंड सॅम्युएल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार फसिओद्दीन शेख व पोलिस प्रशासनाला देलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,

सध्या कोरोना महामारीची भयावह परिस्थिती असताना श्रीरामपूर येथे २६ सप्टेंबर रोजी दोन ते अडीच हजार लोकांना एकत्र जमवून भगवा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन ख्रिस्ती व मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला.

यावेळी शिवप्रहार संघटनेचे मुख्य वक्ते तथा निलंबित पोलीस अधिकारी सुरज आगे यांनी वक्तव्य केले होते. सदर कार्यक्रमाची व्हिडीओ क्लिप सर्वत्र प्रसारीत करण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र समाजात चिड निर्माण झाली आहे.

त्यामुळे सर्व समाज संघटनेच्या वतीने याचा तीव्र निषेध करुन सुरज आगे याच्यावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. यासाठी आज राहुरी तालुक्यातील अनेक संघटना एकत्र आल्या होत्या. आम्ही शिवरायांना मानतो आणि आमचे पुर्वजही हिंदवी स्वराज्य मिळविण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या खांदयाला खांदा लावून लढले होते.

या गोष्टीचा शिवप्रहार संघटनेला विसर पडलेला दिसतो. ख्रिस्ताने शांतता, प्रितीचा व बंधुत्वाचा मार्ग दाखविलेला आहे. आम्ही त्याच मार्गाने चालतो. या सुरज आगे याने जाणून बुजून जातीय तेढ निर्माण व्हावा. या उद्देशाने जे वक्तव्य केले आहे, अतिशय विध्वसंक, विषारी वृत्त केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्यांची कल्पना अतिशय विस्तारीत स्वरुपाची होती. महाराजांनी आपल्या स्वराज्यांची संकल्पना मांडताना सर्वाचा विचार केलेला आहे. परंतु या महाशयांना खरा इतिहासच माहिती नाही. केवळ जातीय तेढ निर्माण करणे, सामाजिक गाल बोट लावणे, या प्रकारचे बेजबाबदार वक्तव्य केलेले आहे.

तेव्हा सुरज आगे याने जाहीर रित्या माफी मागावी. तसेच त्याच्यावर तात्काळ योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी विजय सरोदे, गोरख दिवे, रविंद्र सरोदे, बबन साळवे, संतोष सरोदे, दिपक भालेराव, योगेश सरोदे, प्रदिप हिवाळे, सुभाष संसारे,

दिपक चक्रे, बबलू हिवाळे, आरपीआय चे तालूकाध्यक्ष विलासनाना साळवे, सचिन साळवे, सुनिल चांदणे, सौ. छाया दूशिंग, सौ. स्नेहल सांगळे, वंचित बहुजन आघाडीचे पिंटूनाना साळवे, निलेश जगधने, जालिंदर थोरात, भाऊसाहेब दिवे, सिताराम दिवे, नामदेव पवार,

विजय पवार तसेच विराट सामाजिक प्रतिष्ठान, लहूजी शक्ती सेना, एकलव्य युवा आर्मी आदि संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.