अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- अनधिकृत लॉन्ड्री व्यवसाय करणाऱ्या चालकांमुळे संबंधित परिसरात राहत असलेल्या रहिवाशांना त्रास होत आहे. याबाबत पाहणी करून मनपा आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले तरीही यावर कारवाई झालेली नाही.
ही विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या ड्रायक्लिनर्सवर कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड च्या वतीने देण्यात आला आहे.याबाबत मनपा आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष अमोल खरात, जिल्हाध्यक्ष आकाश वायकर व पदाधिकारी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, अनधिकृत लॉन्ड्री व्यवसाय नगर शहरामध्ये ते राजरोसपणे सुरू असल्याबाबतची तक्रार ऑक्टाेबर महिन्यात दिली होती.
त्यानुसार अनधिकृत लॉन्ड्री चालकांविरुद्ध नोटीस दाखल केल्या होत्या. मात्र पुढे काहीही झाले नाही. याप्रकरणी चौकशी करून अनधिकृत लॉन्ड्री व्यवसाय बंद करावेत व दोषींवर कारवाई करावी अन्यथा याबाबत आंदोलन करण्यात येईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved