अहमदनगर बातम्या

आता तरी काळजी घ्या !जिल्ह्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजारांच्या पुढे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-  नगर शहर व जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या गेल्या आठ दिवसापासून सातत्याने वाढत असून बुधवारी दिवसभरात ४४८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे. नगर शहर व जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

नगर जिल्ह्यात बुधवारी ९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ५२ हजार ५६ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.४५ टक्के इतके झाले आहे. नगर शहर व जिल्ह्यात दिवसभरात ४४८ नवी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १२५ खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५३ आणि अँटीजेन चाचणीत ७० रुग्ण बाधित आढळले.

Ahmednagarlive24 Office