अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : आई-वडिलांना सांभाळा; अन्यथा वारस नोंदींना लागणार ब्रेक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आई – वडीलांची हेळसांड करणाऱ्या अपत्यांना जरब बसावी, यासाठी आई – वडीलांचे पालन पोषण न करणाऱ्या वारसांच्या नोंदी न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जामखेड तालुक्यातील दिघोळ माळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीनी घेतला आहे.

जामखेड तालुक्यातील दिघोळ माळेवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच रंजना पिराजी दगडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत आई-वडिलांचे पालन पोषण न करणाऱ्या वारसाच्या नोंदी न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

असा स्वायत्त लोकहिताची निर्णय घेणारी दिघोळ ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आई-वडिलांना न सांभाळणारे व त्यांची हेळसांड करणारी मुले – मुली हे आपले आई-वडिलांचे ग्रामपंचायत हद्दीतील स्थावर संपत्तीला वारस लावण्यासाठी मागणी करतात.

त्यांच्या वारसनोंदी या कोणत्याही परिस्थितीत करण्यात येऊ नये असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. सदरच्या ठरावात आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या मुला मुलींची सर्व खात्री करण्याची जबाबदारी सर्व लोकनियुक्त सदस्यांनी एकत्रितरित्या घ्यावी, तसेच या कामी वस्तुस्थितीला धरून निर्णय घेण्यात यावे.

या कामे वारसाच्या नोंदी संदर्भात सविस्तर सखोल चौकशी करून निर्णय घेण्यात यावा. असे सर्वानुमते ठरले आहे. सदरच्या ठरावाबाबतची सूचना सरपंच रंजना दगडे यांनी मांडली त्यास सर्व सभागृहाने मान्यता दिली. या सूचनेला ग्रामपंचायत सदस्य बळीराम बाबासाहेब तागड यांनी अनुमोदन दिले.

सदरच्या निर्णयामागे वयोवृद्ध आई-वडिलांचा सांभाळ न करणारी त्यांना चांगली वागणूक न देणाऱ्या हेळसांड करणाऱ्या मुला मुलींना जर बसावी. हा उद्देश असल्याचे सरपंच दगडे यांनी सांगितले. या निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यात सरपंच व उपसरपंच व ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामसेवक यांच्याकडून भाबड यांचे कौतुक केले जात आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office