अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.
यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नुकतेच नरभक्षक बिबट्याने आष्टी तालुक्यात अनेकांचे जीव घेतले आहेत. त्यानंतर करमाळा तालुक्यात शिरलेल्या बिबट्याने आता पर्यंत तीन जणांचे बळी घेतले आहेत. करमाळा तालुक्यातील बिबट्या नरभक्षक बनला असल्याने तो माणसांचे बळी घेत सुटला आहे.
त्यामुळे याभागात प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. यात तिघांचे बळी गेल्याने बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे या बिबट्याला गोळ्या घालण्याची मागणी काही ग्रामस्थांनी केली होती.
बिबट्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे करमाळा तालुक्यातील बिबट्याला दिसता क्षणी गोळ्या घालण्याचा आदेश वन विभागाने दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved