अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- महानगरपालिकेच्या स्विकृत नगरसेवकपदाच्या निवडीसंदर्भात नियमांचे उल्लंघन करण्यात आले असून निवड केलेल्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे.
तसेच कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महापौर बाबासाहेब वाकळे आणि आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी केली आहे.
महापालिकेच्या अधिनियमाप्रमाणे महापौर आणि आयुक्त यांनी स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्याऐवजी मनपाचे नियम पायदळी तुडविले आहेत.
तसेच मनपा आयुक्त मायकलवार यांनी महानगरपालिका सभेचा ठराव विखंडीत करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्याच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
महापालिका सभाक्रमांक ३ दि.१/१०/२०२० चा ठराव विखंडीत करून नाम निर्देशनाद्वारे निवड केलेल्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे. यापूर्वी हि सदर सदस्यांना अपात्र केलेले होते.
ते कोणत्या आधारावर केले होते व ह्या वेळेस तेच सदस्य कोणत्या मुद्द्यावर पात्र झालेले आहेत हा फार मोठा प्रश्न जनतेसमोर आहे.
दरम्यान निवड केलेल्या सदस्यांना अपात्र ठरविण्यात यावे. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख शाकीर भार्ई यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved